शेर्पे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा 2024 मध्ये केंद्रशाळा शेर्पेचे घवघवीत यश

शेर्पे केंद्रबलाच्या नुकत्याच स्पर्धा जि.प.पू.प्राथ.शाळा कुरंगवणे खैराट या शाळेच्या पटांगणावर संपन्न झाल्या .या स्पर्धेत केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले .स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
केंद्रशाळा शेर्पे शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश
100 मीटर धावणे लहान गट( मुली)
कु.श्रावणी पवार -द्वितीय क्रमांक
100 मीटर धावणे लहान गट(मुलगे)
कु.शौर्य शेलार -तृतीय क्रमांक
उंचउडी लहान गट(मुली)
कु.प्राप्ती राऊत -द्वितीय क्रमांक
उंचउडी लहान गट(मुलगे)
कु.शौर्य शेलार -द्वितीय क्रमांक
खो-खो लहान गट (मुली)
विजेता -प्रथम क्रमांक
कबड्डी लहान गट (मुलगे)
उपविजेता -द्वितीय क्रमांक
कबड्डी लहान गट (मुली)
उपविजेता -द्वितीय क्रमांक
100×4 रिले लहान गट(मुली)
उपविजेता-द्वितीय क्रमांक
सहभागी विद्यार्थिनी
कु.श्रावणी पवार
कु.वेदा राऊत
कु.सिद्रा मुजावर
कु.तनिष्का पाटणे
ज्ञानी मी होणार (लहान गट)
प्रथम क्रमांक
कु.श्रीराज बंडगर
कु. सारा रमदुल
समुहगान स्पर्धा
उपविजेता -द्वितीय क्रमांक
समुहनृत्य स्पर्धा
विजेता -प्रथम क्रमांक

200 मीटर धावणे मोठा गट (मुलगे)
कु.शौर्य पवार -द्वितीय क्रमांक
200 मीटर धावणे मोठा गट(मुली)
कु.सृष्टी राऊत -द्वितीय क्रमांक
कबड्डी मोठा गट(मुलगे)
उपविजेता-द्वितीय क्रमांक
कबड्डी मोठा गट (मुली)
उपविजेता -द्वितीय क्रमांक
समुहगान स्पर्धा
विजेता-प्रथम क्रमांक
समुहनृत्य स्पर्धा
विजेता-प्रथम क्रमांक
यामध्ये वैयक्तिक प्रकारात प्रथम व द्वितीय क्रमांक आलेले प्रभागस्तरीय स्पर्धेला पात्र आहेत. तसेच सांघिक स्पर्धेत फक्त प्रथम क्रमांक आलेले पात्र आहेत. क्रीडास्पर्धेचे उद्‌घाटन रविंद्र जठार साहेब,माजी वित्त व बांधकाम सभापती सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .याप्रसंगी उपस्थित संतोष ब्रह्मदंडे सरपंच कुरंगवणे ,स्मिता पांचाळ सरपंच शेर्पे , बबलू पवार उपसरपंच कुरंगवणे,केंद्रप्रमुख संजय पवार ,आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धेच्या निमित्ताने शेर्पे गावातील सरपंच स्मिता पांचाळ, माजी सरपंच निशा गुरव,उपसरपंच सिराज मुजावर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यvमंगेश कांबळे, रझिया जैतापकर,साक्षी तेली, वैष्णवी पवार, विलास पांचाळ,पालक दत्ताराम शेलार, राजेंद्र सावंत,फरिदा रमदुल, सोनाली पवार, वैष्णवी राऊत,मानसी शेलार , तेजस्वी कुलकर्णी, सानिका शेलार आदी उपस्थित होते. या दोन दिवशी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विनामुल्य वाहतूक सुविधा संदिप तेली यांनी उपलब्ध करून दिली . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे शिक्षकवृंद तुषार तांबे, योगिता बंडगर,आर्या कुलकर्णी यांनी केले .
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक शेर्पे गावचेसरपंच,उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्रामस्थ यांनी केले.

error: Content is protected !!