नामदेव रामदास गुळेकर यांची शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे सदिच्छा भेट

शेठ न. म. विद्यालय खारेपाटण चे माजी विद्यार्थी नामदेव रामदास गुळेकर, (असिस्टंट अकाउंट मॅनेजर, कामगार ग्रुप ऑफ कंपनी)यांनी खारेपाटण प्रशालेला भेट दिली. श्री.नामदेव गुळेकर हे खारेपाटण हायस्कूल मधील इयत्ता दहावी च्या सन 1994 बॅचमधील विद्यार्थी असून सध्या मुंबई येथील आर के अँड कंपनी घाटकोपर येथे असिस्टंट अकाउंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. श्री गुळेकर यांनी याप्रसंगी विविध विषयांची 50 पुस्तके प्रशालेचे प्राचार्य श्री संजय सानप यांच्याकडे सुपूर्द केली. भविष्यात स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी विविध पुस्तके प्रशालेस भेट देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशालेच्या परिसराची व प्रशालेच्या इमारतीची पाहणी केली. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री संजय सानप यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री संतोष राऊत सिनियर कॉलेज प्राचार्य श्री कांबळे सर, व प्रशालेतील शिक्षक वर्ग उपस्थित होते. श्री. गुळेकर यांनी प्रशालेस भेट दिल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष- श्री भाऊ राणे,सचिव श्री महेश कोळसुलकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!