पोलीस ठाणे कणकवली यांसकडून शिवडाव महाविद्यालयात “डायल 112” तसेच “नशामुक्त भारत” अभियान संपन्न.
पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई,महिला पोलीस नाईक विनया सावंत,पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी केले मार्गदर्शन.
कणकवली/प्रतिनिधी.
कणकवली पोलीस ठाणे यांसकडून नुकतच शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे सायबर क्राईम तसेच बालक,महिला यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच विद्यार्थी यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी या दृष्टीने आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले.नशा मुक्त भारत अभियान सिंधुदुर्गात सर्वत्र राबविल जात आहे.व्यसन म्हणजे जिवंत मरण,व्यसन सोडा,बहरेल जीवन अशी जनजागृती करण्यात आली.यावेळी ऑनलाईन शॉपिंग तसेच मोबाईल नेटवर्किंगच्या माध्यमातून होणारी फसवूनक,तसेच शालेय मुल,मुली,महिला यांची होणारी फसवणूक यातून सावध कसे राहावे याविषयी योग्य ते सल्ले तसेच तातडीने पोलिसांशी संपर्क करण्यासाठी आवश्यक ते नंबर देण्यात आले.
प्रसंगी पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद देसाई,महिला पोलीस नाईक विनया सावंत,पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत,शिवडाव पोलीस पाटील मयूर ठाकूर,मुख्याध्यापक श्री.पवार सर, सहाय्यक शिक्षक, तसेच विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.