रोजगार निर्मितीसाठी कोकणातच प्रकल्प यायला हवेत याकरता मुख्यमंत्र्यांना भेटणार

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घेणार भेट
रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती
कोकणात प्रकल्प व्हायलाच हवेत रोजगार निर्माण व्हायला हवा. यासाठी रिफायनरी प्रकल्पाला ना चालना देण्याचं काम आम्ही करणार. येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. रवींद्र चव्हाण हे यासाठी पुढाकार घेतील अशी माहिती माजी आमदार व रिफायनरी समर्थक प्रमोद जठार यांनी दिली. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकणातले सर्व आमदार यासाठी एकत्र येणार. कोकण सुद्धा विकासाच्या दिशेने धावणार असे श्री जठार यांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख कोकणातल्या मुलांना रोजगार या माध्यमातून मिळणार. पर्यावरणाची पूर्ण काळजी घेऊन रिफायनरी प्रकल्प करण्यासाठी आमचा आग्राह आहे. Uro 6 टेक्नॉलॉजी करून व्हावा. त्यांच्या जमिनी आहेत असे आमचे बांधव अधिवेशनात बैठकीला जाणार अशी माहिती जठार यांनी दिली.ज्यांच्या जागा जाता जात आहेत अशा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन आम्ही मुख्यमंत्री यांना भेटणार. राजापुरातच हा प्रकल्प व्हावा अशी आमची मागणी असेही जठार यांनी यावेळी सांगितले.