डोकीवर दगड मारून दुखापत केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
कणकवलीत काल रात्री घडली होती घटना
चार दिवसांपूर्वीच्या वादाची माहिती सांगितल्यावरून फिर्यादीला बेदम मारहाण
चार दिवसापूर्वी झालेल्या वादाची माहिती का दिली अशी विचारणा करत त्या रागातून डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केल्याची तक्रार प्रकाश शामराव शिंदे (वय 39 कणकवली बांधकरवाडी) यांनी कणकवली पोलिसात दिली आहे. या तक्रारीनुसार कणकवलीतील वैभव मालंडकर व कलमठ मधील रीमेश चव्हाण व यांच्यासोबत एका अनोळखी 25 वर्षीय तरुण यांच्यावर बी एन एस कलम 118 (1), 352, 351 (3), 3 (5) नुसार कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता रीमेश चव्हाण यांनी फिर्यादी याना अन्नपूर्णा बार येथे बोलावून घेतले. त्यावेळी संशयित आरोपीने मद्यपान केले होते. त्याचे बिलाचे पैसे मी दिल्याचे फिर्यादीत प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे. त्यानंतर 9.15 वाजण्याच्या सुमारास रीमेश चव्हाण यांनी वैभव मालंडकर याला फोन लावून बोलावून घेतले. त्यानंतर वैभव मालंडकर व त्याच्यासोबत अजून एक अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आली. चार दिवसापूर्वी रिमेश चव्हाण यांचे गोट्या सावंत यांच्याशी वाद झाले होते. त्यावेळी वैभव मालंडकर याला फिर्यादी यांने रीमेश याने गोट्या सावंत यांच्याशी वाद का घातले अशी विचारणा केली होती. या रागातून रीमेश चव्हाण यांने फिर्यादी प्रकाशाला तू ही बाब वैभव मालंडकर याला का सांगितली अशी विचारणा करत तुझी मागची लफडी भरपूर आहेत असे म्हणत रीमेश चव्हाण व वैभव मालंडकर या दोघांनी प्रकाश याना पाठीमागून पकडत त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून डोकीवर दगड मारल्याची फिर्याद प्रकाश शिंदे यांनी दिली आहे. व परत भानगडी केल्यास तुला ठार मारून टाकू अशी देखील धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.