ओसरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग आंगणे यांचे निधन
ओसरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक पांडुरंग केशव आंगणे (92 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने दिनांक 11 डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. ते मिल कामगार आणि युनियन नेते आणि सल्लागार म्हणुन काम पाहिले होते. ओसरगावचे जेष्ठ मार्गदर्शक, ओसरगाव विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, देवस्थान समितीचे माजी सल्लागार, शिक्षण प्रेमी होते. ओसरगावच्या सामाजिक,शैक्षणिक आणि विकास कार्यात त्यांचा मोठा सहभाग असे.
ओसरगाव येथील साईश नर्सरी चे मालक दीपक आंगणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी , सुना व नातवंडे आहेत. ओसरगाव येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक आणि आप्तेष्ट उपस्थित होते.