चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव १४डिसेंबरपासून

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीचा यात्रोत्सव मंगळवार दिनांक १४डिसेंबर ते १८डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे..पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी नऊ वाजता यात्रोत्सवास सुरुवात होणार आहे.दुपारीबारा वाजल्यापासून श्री देवी भगवती माऊलीस मानकरी यांच्या तर्फे महाप्रसाद अर्पण केला जाणार. रात्रौ अकरा वाजता ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामदेवतांच्या तरंगांचे भगवती मंदिरांत आगमन होणार आहेत.पहाटे तीन वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दिवट्यांचे नृत्य होणार आहे.रविवार१५डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून स्थानिक भजने होणार आहेत.यात श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवूळवाडी, श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, रात्री साडेसात ते साडेआठ दरम्यान गावडे पुरुष प्रासादिक भजन मंडळ गावडे वाडी यांचे भजन होणार आहे.रात्रौ ९वाजल्यानंतर पुराण, किर्तन श्रींची आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.सोमवार १६डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजल्या पासून स्थानिक भजने यात श्री सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ सडेवाडी, श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकर वाडी, श्री देव वाडत्री ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ कोंड अपराजवाडी यांचे भजन ,श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजन होणार आहे.
रात्रौ ९ वाजता पुराण, गोंधळ, आरती आदी कार्यक्रम. मंगळवार १७डिसेंबर रोजी श्री देव ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ लब्दे वाडी, श्रीदेव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ तेरई वाडी,श्री देवआकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठण वाडी यांचे भजन होणार आहे.रात्रौ नऊ वाजता पुराण गोंधळ किर्तन, आरती आदी कार्यक्रम. बुधवार १८डिसेंबर रोजी दुपारी तीन ते सहा चालू वहिवाट दार सर्व महिला, वेदिका घाडी, प्रेरणा घाडी, प्राजक्ता घाडी, आराध्या घाडी , सोनाली घाडी यांच्या मार्फत हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी सहा नंतर स्थानिक भजने यात श्री देव पिसाळी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ तेरई, श्री देव भगवती प्रासादिक भजन मंडळ भटवाडी यांची भजने होणार आहेत.रात्रौ दहा वाजता
जय हनुमान पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ ओरोस दांडेली यांचे दशावतारी नाटक विंध्य वासिनी विंद्येश्वरी हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.यानंतर रात्रौ २.३० नंतर गोंधळ किर्तन , लळित समाप्ती व दिवट्या नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!