कळसुली श्री. जैन गिरोबा मंदिरात 14 डिसेंबरला जत्रोत्सव

कणकवली दि. 10 डिसेंबर ( प्रतिनिधी )तालुक्यांतील कळसुली गावचे ग्रामदैवत श्री. जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव शनिवार 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्त श्री.देव जैन गिरोबा मंदिरात सकाळी देवाच्या विधीवत पूजेसह ,विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री १२ वा. खानोलकर दशावतारी नाटक, असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी जत्रेला उपस्थित रहावे, असे आवाहन कळसुली मानकरी आणि ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!