चिंदर येथे अखेर एस टी बस सुरु

चिंदर ग्रामपंचायत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे,संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री यांचे विशेष प्रयत्न

ग्रामस्थांनी लालपरीचे स्वागत करत प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मानले विशेष आभार

चिंदर गावातील पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी, लब्देवाडी या भागातून गेली अनेक महिन्यानची प्रतीक्षा असलेली लालपरी अखेर आज धावली. सकाळी 7. 20 वाजता मालवण आगारातून सुटणारी मालवण भगवंतगड एस. टी बस सकाळी 8 वाजता चिंदर भटवाडी येथे आली असता पालकरवाडी, पाठणवाडी, साटमवाडी, लब्देवाडी ग्रामस्थांच्या वतीने एस. टी बसचे पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच नम्रता महंकाळ, माजी सभापती हिमाली अमरे, आबा लब्दे, प्रिया पालकर, प्रतीक्षा पालकर, शंकर पालकर, विजय गोलतकर, नित्यानंद मेस्त्री, विश्वभर चेंदवणकर यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

नवीन एस. टी बस फेरी चालू होण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर ग्रामपंचायत उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, भाजप जिल्हा ओबीसी सरचिटणीस प्रकाश मेस्त्री, ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने एस. टी बस फेरी सुरु झाल्या बद्दल समाधान व्यक्त करत एस. टी बस फेरी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
error: Content is protected !!