सावंतवाडी येथे अभाविप अधिवेशन पोस्टर चे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते अनावरण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच सावंतवाडीमध्ये होत असलेल्या ५९ व्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदअधिवेशनाचे पोस्टरचे (भित्तिपत्रक) अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,कोकण अधिवेशन समितीचे सचिव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अभाविप प्रदेश सहमंत्री राहुल राजोरिया यांच्या हस्ते सावंतवाडी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात करण्यात आले. कोकणात पहिल्यांदाच ५९ वे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे अधिवेशन होत असून नुकतेच ३डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे कार्यालयाचे उद्घाटन व अधिवेशनाचा लॉन्चिंग कार्यक्रम शुभारंभ भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर ८ डिसेंबर रोजी अधिवेशन पोस्टरचे अनावरण सावंतवाडी येथे करण्यात आले संघ परिवाराला शंभर वर्षे पूर्ण होत असून याच पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशन पोस्टर अनावरण प्रसंगी लखमराजे भोसले,साईनाथ सितावर, अन्नपूर्णा कोरगावकर,शहर मंत्री स्नेहा धोटे,व्यवस्था प्रमुख चिन्मयी खानोलकर अवधूत देवधर,शिवाजी भावसार, जिल्हा संयोजक अथर्व शृंगारे, डॉ.हर्षदा देवधर,राजू राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.महाविद्यालय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी त्यातूनच एक नवी पिढी व जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळेल हा दृष्टिकोन ठेवून हे अधिवेशन होत आहे

error: Content is protected !!