फोंडाघाट मधील किशोर सामंत यांच्याकडून आचरा येथील काव्या शेळके ला 25 हजार ची आर्थिक मदत

सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांच्यामार्फत मदत पालकांकडे सुपुत्र
मालवण तालुक्यातील आचरा येथील
तीन वर्षाची कु. काव्या शेळके हिला ब्लड कॅन्सर च्या दुर्धर आजारावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु आहेत. काव्या हिच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे काव्याच्या वैद्यकीय व अन्य उपचारासाठी मदतीचे आवाहन कोकण नाऊ चे आचरा प्रतिनिधी यांनी बातमी करून सर्वप्रथम केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि दातृत्वाच्या भावनेने मदतीचा हात फोंडाघाट गावातील किशोर वासुदेव सामंत उर्फ आप्पा बामन यांनी दिला आहे. किशोर सामंत यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत गुगल पे च्या माध्यमातून काव्याच्या वडीलांकडे पोहोच केली आहे. कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते गौरव गवाणकर यांच्याकडे किशोर सामंत यांनी २५ हजार रुपये सुपूर्त केले होते. गवाणकर यांनी तात्काळ काव्याच्या वडिलांना गुगल पे द्वारे ही रक्कम पोच केली आहे. या दुर्धर आजारातून काव्या लवकरात बरी होण्यासाठी सदिच्छा सामंत यांनी व्यक्त केल्या आहेत. ब्लड कॅन्सरग्रस्त कु. काव्या शेळकेच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढील मोबाईल नंबर अथवा बॅक खात्यात मदत करण्याचे आवाहन कोकण नाऊ च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
बँक तपशील
नाव :- सेजल चंद्रशेखर शेळके
बँकेचे नाव :- बँक ऑफ इंडिया
शाखा :- आचरा
आय एफ एस सी कोड: BKID0001472
खाते क्रमांक :- 147210110006561
गुगल पे क्रमांक
संतोष शेळके-9359917346
अधिक माहितीसाठी संपर्क
चंद्रशेखर शेळके – 9420822659