कुडाळ तालुका शिवसेना महिलाप्रमुख पदी सिद्धी सिद्धेश शिरसाट

कुडाळ शहर बाजारपेठेसह तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : कुडाळ शहर बाजारपेठेसह कुडाळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कुडाळ तालुका शिवसेना महिलाप्रमुख पदी सिद्धी सिद्धेश शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर इतर नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले होते. कुडाळ येथे शालेयमंत्री दीपक केसकर, आमदार रवींद्र फाटक, ब्रिगेडीयर माजी खासदार सुधीर सावंत, महिला आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ शहर बाजारपेठेसह कुडाळ तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये सिद्धी शिरसाट, उदय पावसकर, अमोल शिरसाट, मेघा शिरसाट, गणेश नार्वेकर, दर्शन इब्रापूरकर, कौशल्य नाईक, कौस्तुभ तेली, जावेद शहा, सर्वेश केरकर, गौरव वरावडेकर, तेजस केरकर, शुभम शिरोडकर, चेतन साटेलकर, बाबूश फर्नाडिस, संतोष देऊलकर यांच्यासह कुडाळ तालुक्यातील अनेकांचा समावेश होता. यावेळी कुडाळ महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, वाडीवरवडे उपविभागप्रमुख आशु अग्रवाल, पावशी मतदारसंघ विभागप्रमुख आराध्या करलकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या प्रवेशप्रसंगी सिद्धेश शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर, सीताराम चव्हाण, अनुप्रीती खोचरे, रामकृष्ण गडकरी, चैतन्य कुडाळकर, पिंगुळी विभागप्रमुख रसिका पाटकर, जयदीप तुळसकर, अनिरुद्ध गावडे, अनिल वरवडेकर, रघुनाथ साधले, महेंद्र सातार्डेकर शिवसैनिक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नूतन कुडाळ महिला तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट म्हणाल्या की, माझे सासरे अशोक शिरसाट हे त्यावेळी उपजिल्हाप्रमुख होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांचा आदर्श ठेवूनच मी शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे. शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना महिला अधिक संघटित कशा होतील या दृष्टीकोनांतून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असे सांगितले

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!