सारस्वत समाज बांधवांचे गुरु प. पू. श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामींचे लांजा येथे आगमन
लांजा सारस्वत वसाहत येथील मनोज तेंडुलकर यांच्या निवासस्थानी स्वागत
सारस्वत ज्ञाती बांधवांची दर्शनासाठी मोठी उपस्थिती
लांजा : सारस्वत समाज बांधवांचे गुरु प. पू. श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी यांचे लांजा सारस्वत वसाहत येथील मनोज तेंडुलकर यांच्या निवासस्थानी समाज बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सद्गुरू दर्शन सोहळा विशेषांकाचे स्वामींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प.पू. श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी हे कवळे मठ फोंडा-गोवा येथील मठाचे ७७ वे मठाधिपती आहेत. सारस्वत समाज बांधवांचे गुरु असणारे प.पू श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी हे आज लांजा दौऱ्यावर आले आहेत. सायंकाळी लांजा सारस्वत वसाहत येथील मनोज तेंडुलकर यांच्या निवासस्थानी त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे सारस्वत समाज बांधवांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले.
श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी हे उद्या, १४ रोजी पावस येथील ज्ञाती बांधवांच्या भेटी घेणार आहेत. तसेच बुधवार, १५ मार्च रोजी हर्चे डोर्ले येथील बांधवांच्या भेटी घेणार असून त्यानंतर गुरुवार, १६ मार्च रोजी पाली येथील सारस्वत ज्ञाती बांधवांच्या भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी लांजा आग्रे व्हाॅल या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व दौरा आणि कार्यक्रमासाठी लांजा येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, महिलावर्ग मेहनत घेत आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, लांजा