आचिर्णे येथील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, धनगर समाजाचे नेते संतोष बोडके यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी तालुक्यातील शिराळे, करूळ, आर्चिणे, सडुरे सांगूळवाडी, नावळे येथील कार्यकर्त्यांनी ही घेतला भाजपचा झेंडा हाती
सांगुळवाडी ठाकरे सेनेचे ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार यांचाही भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
आचिर्णे येथील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, धनगर समाजाचे युवा नेते संतोष बोडके यांचा भाजपात प्रवेश केला आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे, करूळ, आर्चिणे, सडुरे सांगूळवाडी, नावळे येथील कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. सांगुळवाडी ठाकरे सेनेचे ग्रामपंचायत सदस्य सत्यवान सुतार यांचाही भाजपात प्रवेश झाला आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये भिकाजी शेळके, आडुळकर गुरुजी, इं.डी बोडेकर, संतोष गुरखे, रामचंद्र बोडेकर, प्रकाश खरात, सिताराम काळे, शरद बोडके, विक्रांत झोरे, अक्षय तांबे, किरण तांबे, गंगाराम वनकर, अनुप तांबे, तुकाराम गुरखे, धोंडीराम गुरखे, रवींद्र शेळके, भैरू गुरखे, जनार्दन झोरे, गणपत झोरे, बाबूजी गुरखे, जनार्दन बोडके बाबू काळे, राहुल झोरे व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.