कणकवली नगरपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती विविध उपक्रम

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती

    कणकवली शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम मतदार संघ 268 कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासा टीव्हीठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने आज दि.14/11/2024 रोजी कणकवली कॉलेज पटांगणावर मा.जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील, मा.तहसिलदार श्री.दीक्षांत देशपांडे, मा.गटविकास अधिकारी श्री.अरुण चव्हाण, मा.नायब तहसिलदार श्री.दिलीप पाटील, मा.जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.विनायक औंधकर, मा.मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील,   कणकवली कॉलजचे प्राचार्य श्री.महलिंगे सर,  विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कांबळे सर, भिसे सर, जुनियर कॉलेजचे सावंत सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मतदान शपथ, मतदार हस्ताक्षर, मतदार सेल्फी पॉईंट अभियान व कणकवली कॉलेज तर्फे पथनाट्य राबविण्यात आले.
        तसेच कणकवली नगरपंचायत व कणकवली कॉलेज तर्फे शहरात लोकशाही दिंडीसह पायी रॅली आयोजित करण्यात आली. सदर रॅली मध्ये शहरातील बचत गटाच्या महिला, कणकवली कॉलेजची मुले, शहरातील नागरिक व कणकवली नगरपंचायत कर्मचारी असे सर्व एकूण 500 जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.निलेश पवार यांनी केले.    
          नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मा.जिल्हाधिकारी श्री.अनिल पाटील, व कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.
error: Content is protected !!