वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील ठाकरे सेनेच्या माजी शाखाप्रमुख अर्चना राठोड यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती
वैभववाडी तालुक्यातील जांभवडे गुरववाडी येथील ठाकरे सेनेच्या माजी महिला शाखाप्रमुख अर्चना बाबुराव राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बाबू काशीराम राठोड, कृष्णा सदाशिव गुरव, रजिता राजाराम गुरव, अंजनी अनाजी गुरव व इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मनोहर फोंडके, माजी सरपंच किशोर कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.