मृत घोरपडीचे फोटो सोशल मिडियावर टाकणे भोवले

साटेली भेडशीतील युवकाला वन विभागाकडून अटक

दोडामार्ग
साटेली भेडशी येथील राजन पांडुरंग सावंत याने अधिसुचित असलेल्या घोरपडीची शिकार केली आणि मृत अवस्थेत हातात पकडून फोटो काढून फेसबुकवर प्रसारीत केल्याबाबत अटक करण्यात आली.ही बाब वन विभागाच्या निदर्शनास आल्याने त्याबाबतची पडताळणी करून संशयित आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला चोकशीसाठी ताब्यात घेतले व चोकशीअंती बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) सावंतवाडीचे वैभव बोराट, दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली स्वरूप मंडल, कोनाळ वनपाल किशोर जंगले, कोनाळ वनरक्षक सुशांत कांबळे, हेवाळे वनरक्षक जीत काळकर, घोटगेवाडी वनरक्षक मयुरेश करंगुटकर, वनरक्षक श्री.बाबाडे, शुभम वारके, वनमजूर रामराव लोंढे, यानी पार पाडली.दरम्यान,आपल्या आजूबाजूला अशा प्रकारच्या घटना घडत असल्यास किवा वन्य प्राणी शिकार किंवा तस्करी होत असेल तर वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ वर सपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!