वैभववाडी मध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सभा

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संदेश भास्कर पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता वैभववाडी बाजारपेठेतील दुर्गामाता सार्वजनिक चौक येथे होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केले आहे.
error: Content is protected !!