शहराची हवा लागलेल्या संदेश पारकर यांना 22 वर्षांनी नागवे गावची आठवण का झाली?

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस संदेश उर्फ मन्या सावंत यांचा सवाल
नागवे गाव आमदान नितेश राणेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार
महायुती सरकारच्या काळात आ.नितेश राणे यांच्या माध्यमांतून नागवे गावात गेल्या 2 वर्षामध्ये 7 ते 8 कोटी ची विकास कामे झाली हे खरे वास्तव आहे. त्यामुळे नागवे गावाची जनता विकासाची साथ सोडणार नाहीत याची मी ग्वाही देतो अशी माहिती भाजपाचे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांनी दिली.
नागवे गावाची संदेश पारकर यांची झालेली सभा म्हणजे फक्त दिखावा आहे. नागवे गावच्या विकासात संदेश पारकर यांचे योगदान काय ते सांगा? आणि मगच नागवे गावातून मतदानाची अपेक्षा करा असं टोला श्री सावंत यांनी लगावला आहे. 2002 साली कणकवली नगरपंचायत ची निर्मिती झाल्यावर नागवे गाव ग्रामीण भागात विभागला गेला. त्यांनतर शहरची हवा लागलेल्या संदेश पारकरना नागवे गावाची विसर पडला. ती आज त्यांना अचानक सुमारे 22 वर्षांनी नागवे गावाची आठवण कशी काय झाली असा सवाल मन्या सावंत यांनी उपस्थित केला.
राहिला दलाली चा प्रश्न तर 2018 च्या नगरपंचायत निवडणुकीत स्वतः कोणाची दलाली करत होते हे सगळ्या लोकांना माहीत आहे. आपले झाकून दुसऱ्याला उघडे पडण्याच्या नादात स्वतःच आपल्या दलालीची कबुली देत आहेत. या दलालीचा त्यांनी स्वतः खुलासा करावा असे आव्हान श्री सावंत यांनी दिले आहे.