कणकवलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अनागोंदी कारभाराचा बँक ग्राहकांना फटका

50 हून अधिक ग्राहक बँकेत असताना सेवा देण्याकरता अवघे दोन कर्मचारी

बँक मॅनेजर म्हणतात बँकेच्या वरिष्ठांचा संपर्क क्रमांक माझ्याजवळ नाही

बँक ऑफ महाराष्ट्राच्या या अनागोंदी कारभाराबद्दल ग्राहकांमधून नाराजी

कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये आज गुरुवारी आपल्या कामानिमित्त आलेल्या ग्राहकांना तब्बल 1 तासाहून अधिक वेळ रांगेत खोळबुन राहावे लागले. याबाबत बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडे दोनच कर्मचारी आहेत. बँकेचा टर्नओव्हर वाढला तर कर्मचारी देतो असे वरिष्ठ कार्यालयाने सांगले आहे. त्यामुळे मी काही करू शकत नाही. यावेळी बँक ग्राहकांनी वरिष्ठ कार्यालयाचा संपर्क क्रमांक मागितला असता माझ्याजवळ वरिष्ठ कार्यालयाचा नंबर नाही. बाहेर असेल तर पहा. शिपायाला विचारा. अशी उडवा उडवी ची उत्तरे देखील दिली. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या या अनागोंदी कारभाराबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आज बँकेचे आर्थिक व्यवहार करण्याकरिता एक कॅश काउंटरला कर्मचारी व त्या बाहेरील काउंटरला एक कर्मचारी व बँक मॅनेजर व अन्य शिपाई वर्गवारीतील कर्मचारी एवढे जन होते. यापैकी बँकेचे कामकाज करण्यासाठी तीन कर्मचारी असताना देखील प्रत्यक्षात नागरिकांना बँक ग्राहकांना तासंतास रांगेमध्ये खोळंबुन राहावे लागले. याबाबत बँक मॅनेजर यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे देत रत्नागिरी येथील क्षेत्रीय कार्यालयाचा क्रमांक देखील देण्यास नकार देण्यात आला. शिपयांकडून नंबर घ्या अशी माहिती त्यांनी उपस्थित ग्राहकांना दिली. त्यामुळे या बँक मॅनेजर यांच्या अनागोंदी कारभाराने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान बँके संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास बँकेत तक्रार पेटी असणे आवश्यक आहे. तशी तक्रारपेटी या बँकेमध्ये ठेवलेली आहे. मात्र ही तक्रार पेटी केव्हा उघडली? किंवा काय? याबाबत कोणतीही माहिती समोर प्रदर्शित करण्यात आलेली नाही. तसेच बँकेच्या कामकाजा संदर्भात तक्रार असल्यास याकरता संपर्क साधण्यासाठी कोणतेही संपर्क क्रमांक बँकेच्या दर्शनी भागावर किंवा आतील भागावर लावलेले नाहीत. त्यातच मुंबई येथील बँकेच्या काही शाखांचे नंबर दूरध्वनी क्रमांक येथे प्रदर्शित करण्यात आले. मात्र हे प्रदर्शित केलेले दूरध्वनी क्रमांक चुकीचे असल्याचे रिप्लाय येत असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र आपला कारभार सुधारणार का? किंवा याबाबत बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ या संपूर्ण प्रकरणी लक्ष देणार का? असा सवाल बँक ग्राहकांमधून केला जात आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

Leave a Reply

error: Content is protected !!