कणकवली मतदारसंघात नितेश राणेंना टक्कर देण्यासाठी तूर्तास उमेदवारच सापडेना

राणें विरोधात ठाकरेंच्या चार उमेदवारांची नावे चर्चेत पण शिक्कामोर्तब एकावरही नाही

सोशल मीडिया वर आमदार नितेश राणेंची आचारसंहितेपूर्वीच प्रचारात आघाडीवर

“ठरलय नक्की, 23 तारीख ला हॅट्रिक पक्की” पोस्ट ठरतेय सर्वाधिक चर्चेत

समोर विरोधी पक्षाला अजून उमेदवार मिळत नाही.अशा स्थिती व जरी एकतर्फी निवडून येण्याची स्थिती असली तरी ते बेसावध देखील राहत नाही. विरोधी पक्ष चाचपडतोय उमेदवारी जाहीर करायला घाबरतोय. असं काहीसं वातावरण असताना मात्र आपल्या निवडणूक जिंकण्याचा खास स्टाईल ने मात्र आमदार नितेश राणे यांच्याकडून एकतर्फी प्रचाराचा धूरळा उधळला जातो आहे. विकास कामांची भूमिपूजन करून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ कधीच फोडला. पण दुसरीकडे आमदार नितेश राणेंच्या विरोधात कोण हे अद्याप तरी अस्पष्टता आहे. शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या प्रामुख्याने चार नावे चर्चेत आहेत. यात जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत ,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे हे चार दावेदार असले तरी ठाकरे गट अद्याप उमेदवार कोण हे स्पष्ट करत नाही. काही दिवसांपूर्वीच कणकवलीतील एका हॉलमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये खासदार विनायक राऊत यांनी एक कोणतरी उमेदवार असणार त्यामुळे तिघांनी त्यांचं काम करायचं असे संकेत दिले. मात्र हे संकेत देत असताना आचारसंहिता जाहीर झाली तरी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर होत नाही. त्यामुळे या कणकवली विधानसभेच्या राजकारणातला र हा आज मीतिला तरी राणेंच्या नावाने आघाडीवर आहे.कणकवली विधानसभेमध्ये ही जागा काँग्रेसला जाईल अशी चर्चा काही जणांकडून सध्या सुरू आहे .परंतु काँग्रेस आज घडीला मतदार संघात अस्तित्वहीन अशीच आहे त्यामुळे मतदारसंघातील लढत ही ठाकरे विरुद्ध राणे अशीच होणार हे देखील स्पष्ट आहे. मात्र ठाकरेंचा मोहरा कोण असणार ते मात्र अद्याप अस्पष्ट असल्याने त्या साऱ्यांमध्ये आमदार नितेश राणे 27 हजार प्लस ची गणिते मांडूनच आपली वाटचाल करताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांचे समर्थक कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्त्यांन कडून आचारसंहिता जाहीर होताच सातत्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ केला आहे. या तुलनेत विरोधी पक्ष सोशल मीडियावर अस्तित्वहीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच या निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी होत असताना 23 तारीख ही आमदार नितेश राणेंसाठी लकी मानली जाते. आमदार नितेश राणेंच्या कार चां नंबर 23 आहे. 23 नंबर हा रांणेंसाठी शुभ मानला जात असताना त्याचाच आधार घेत सोशल मीडियावर “ठरलय नक्की 23 तारीख ला हॅट्रिक पक्की” अशी पोस्ट देतील सध्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. कणकवली मतदार संघापुरतेच नव्हे तर राज्यात हिंदूंचे नेते म्हणून नाव समोर येत असलेल्या आमदार नितेश राणेंच्या विरोधात कडवी टक्कर देण्यासाठी आता कोण उभे ठाकणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. सध्याच्या स्थितीत समाज माध्यमांमध्ये आमदार नितेश राणे यांचा बोलबाला सुरू असल्याने या मतदारसंघातील लढत आता रंगतदार ठरणार एवढे मात्र निश्चित.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!