शांत सुसंस्कृत मतदार संघ अशी ओळख असणाऱ्या सावंतवाडीत यावेळी मतदार कोणाला कौल देणार ?

दीपक केसरकर, राजन तेली विशाल परब, आणि अर्चना घारे यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता

सावंतवाडी (प्रतिनिधी)शांत संयमी आणि सुसंस्कृत मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी सावंतवाडीचे मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे कारण यावे दीपक केसरकर यांच्यासमोर विशाल परब यांनी तगड आव्हान उभे केले आहे गेले काही महिने विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ पिंचून काढला आहे एका बाजूला दीपक केसरकर यांनी विकास कामांचा धडाका लावला असताना दुसऱ्या बाजूला विशाल परब यांनी गावागावात जाऊन संघटना पातळीवर काम केले गेल्या काही दिवसात विशाल परब यांनी जे कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाला युवा वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे दुसऱ्या बाजूला दीपक केसरकर यांनी विकास कामांच्या माध्यमातून गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या दोन वर्षात दीपक केसरकर यांचा या मतदारसंघात म्हणावा तसा संपर्क नहोता आणि त्याचाच फायदा विशाल परब यांनी उचलल्याचे पाहायला मिळतय त्यामुळे यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे दुसऱ्या बाजूला राजन तेली यांनी सुद्धा दीपक केसरकर यांच्यावर बऱ्यापैकी आरोप प्रत्यारोप केलेत मात्र विशाल परब यांनी कोणतेही आरोप करण्याचे टाळलं आहे राजन तेली हे सध्या या मतदारसंघातून इच्छुक आहेत ते उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी करत आहेत मात्र महाविकास आघाडी कडून गेल्या काही दिवसात अर्चना घारे यांनी सुद्धा गावागावात प्रचार केलाय त्यामुळे अर्चना घारे विशाल परब राजन तेली आणि दीपक केसरकर असा तगडा सामना या मतदारसंघात पाहायला मिळेल मात्र शांत संस्कृत शहर म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे गेल्या काही वर्षात याच स्वभावामुळे दीपक केसरकर यांना कौल मिळाला आहे यावेळी मात्र विशाल परब यांनी दीपक केसरकर यांच्या तोडीस तोड काम करण्याचे प्रयत्न केले आणि यामुळेच या मतदारसंघात मतदारांचा कौल कोणाला हे येत्या काही दिवसात ठरणार आहे मात्र तगड आव्हान विशाल परब यांनी उभं केलं आहे त्यांच्यासमोर राजन तेली दीपक केसरकर आणि अर्चना घारे यांचा कशा पद्धतीने सामना होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

error: Content is protected !!