चालकाला डुलकी लागल्याने अपघात

दोडामार्ग
आंबेली येथे चालकाला डुलकी लागल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला.अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (के ए ०२ एमपी ४६५५) घेऊन बंगळूरूहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याला आंबेली येथे अचानक डुलकी लागली व कार रस्ता सोडून बाहेर जात झाडाला धडकली. घटना सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.