खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन…

करूळ घाट वाहतुकीस सुरू न केल्यास जनआंदोलन करणार — संदेश पारकर, जिल्हाप्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)

तरळे नाधवडे वैभववाडी करूळ गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ करूळ घाट मार्ग हा दुरस्तीच्या करणास्तव सुमारे १ वर्ष बंद असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून याचा जाब विचारण्यासाठी व सरकारला जाग आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार सकाळी ११.३० वाजता खारेपाटण येथील सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय कार्यालय येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क.प्रमुख अतुल रावराणे,युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैभववाडी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वैभववाडी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर,कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर,वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके,मही सभापती लक्ष्मण रावराणे,महिला तालुका प्रमुख माधवी दळवी व वैदही गुडेकर,गुलाजार काझी,यशवंत गवाणकर,गणेश पवार,कोळपे सरपंच सुनील कांबळे,मोतीराम माने,उपविभाग प्रमुख नितीन शेलार,अनंत नांदलस्कर,दीपक पवार,जयेश पवार,समीर कोदे,राजेश वाघरे तसेच खारेपाटण येथील युवासेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत,विभाग प्रमुख निखिल गुरव शाखा प्रमुख दिगंबर गुरव आदी महविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरकारला जाग आणण्यासाठी कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.तर कायदा सुव्यवस्था चोख राहावी.या दृष्टीकोनातून कणकवली पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप हे पोलीस पथकासह खारेपाटण येथे उपस्थित होते.यावेळी आंदोलकांनी खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता श्री अतुल शिवणीवार याची भेट घेऊन करूळ घाट मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा बाबत जाब विचारला यावेळी खारेपाटण शाखा सहा.अभियंता श्रेणी -२ पवन पाटील, करूळ घाट कामाचे कन्सल्टिंग महेंद्र कुंभार उपस्थित होते.
करूळ घाट हा गेले वर्षभर दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला असून राज्यातील ही पहिली घटना असेल की घाट मार्ग पूर्णतः हा बंद ठेऊन काम सुरू आहे. यामुळे पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे यामुळे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे हा घाट रस्ता तातडीने एकमार्गीका सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली. तर सदर घाट रस्ता हा ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुरू न केल्यास मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
यावेळी आंदोलनकर्ते व बांधकाम अभियंता यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून आंदोलकांना शांत केले.तसेच तळेरे ते करूळ घाट मार्ग गगनबावडा रस्त्याची तातडीने डागडुजी करून रस्त्यावर पडलेले खड्डे लवकर भरावे,एका मार्गिका रस्ता महिनाभरात सुरू करावा.वरिष्ठ अधिकारी व महविलकास आघाडी कार्यकर्त्याची या विषयावर तातडीची बैठक बोलवावी.आदी मागण्या आंदोलकांना कडून करण्यात आल्या.तर खारेपाटण उपविभगिय अभियंता अतुल शिवणीवार यांनी प्रशासणाच्या वतीने बाजू मांडत करूळ घाट मार्ग लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनी चर्चा करून व प्रशासनाशी समन्वय साधून व परवानगी घेऊन स दि.११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करूळ घाट मार्गातून स्थानिक हलकी प्रवासी एकरी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र
उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण कार्यालयाच्या वतीने आंदोलन कर्त्याना देण्यात आले.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासन पत्रावर आंदोलन तुर्तास स्थिगीत करत असल्याचे जाहीर केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!