असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्या शाखेचा शुभारंभ

जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतीश सावंत,संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असलदे येथील नूतन शाखेचे उद्धाटन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत असलदे नवीन शाखेचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी असलदे पंचक्रोशीतील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उद्योजक रामू विखाळे, कासार्डे विभागप्रमुख तात्या निकम, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख आबू मेस्त्री, मजीद बटवाले, राजा म्हसकर, संदीप शिंदे, भाई साटम, संजय डगरे, अक्षय जेठे, विजय डगरे, लक्ष्मण लोके, सारिखा खरात, स्वरा डगरे, स्वपना डामरे तसेच महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी