महाराष्ट्र राज्य स्तरीय नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री.सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान.

कणकवली/मयूर ठाकूर.
महाराष्ट्र राज्य स्तरीय नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हरकुळ खुर्द गावडेवाडीशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.सुनील लक्ष्मण ठाकूर यांना प्रदान करण्यात आला .
सन२४/२५ या शैक्षणिक वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा कराडमध्ये संपन्न झाला . यावेळी मा.चंद्रकांत दादा पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जुन्या नव्या पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा केली.शिक्षक काय करु शकतो व राजकारण म्हणजे काय हे शिक्षकांकडून शिकावे तसेच ५० कार्यकर्ते संभाळण्यापेक्षा ५शिक्षक संभाळलेतर २००/मत सहज मिळतात हे उदाहरणासह अतुल बाबा भोसले कृष्णा सहकारी साखर कारखाना व मेडिकल कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात श्री ठाकूर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले बद्दल अनेक मान्यवर मंडळींनी व दारिस्ते व हरकुळ खुर्द गावातील सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.या पुर्वी देखील श्री. सुनील ठाकूर यांना
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार,
महाकवी वामनदादा कर्डक आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,
महाराष्ट्र राज्य साई संस्थान शिर्डी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.
अबब माझा वृत्त निवेदिका ज्ञानदा चव्हाण/कदम यांच्या कडून उत्कृष्ट शालेय कामाबद्दल सन्मान पत्र असे विविध पुरस्कार मिळाले आहेत





