बांधकाम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठाकरे शिवसेनेला रोखले

ज्यांना माहिती हवी ती येत्या काही दिवसात देणार, उपअभियंता यांचे आश्वासन

उपभियंत्यावर प्रश्नांची सरबत्ती, कार्यकारी अभियंता मुबंई ला

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची करायची, नंतर टेंडर प्रक्रिया करायची अशी झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड जबाबदार आहेत. त्यामुळेच भेटण्याची वेळ मागून देखील भेटत नाहीत. राजकोट किल्ला व पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा याबाबत सर्व निविदांची माहिती द्यावी. कणकवली तालुक्यातील 13 कोटींच्या 2 पुलांची निविदा ऑनलाईनला का दिसत नाही. यासह विविध प्रश्नांचा भडीमार ठाकरे शिवसेनेचे सतीश सावंत , सुशांत नाईक , कन्हैया पारकर , उत्तम लोके यांच्यासह पदाधिका-यांनी केला. त्यावर 11 ऑक्टोबरला सर्व माहिती लेखी स्वरुपात दिली जाईल , असे आश्वासनाचे पत्र उपअभियंता श्री. बातुसकर यांनी दिले.
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. सर्वगोड यांच्या भेटीसाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वेळ मागितली होती. मात्र ते कामानिमित्त मुंबईत गेले . मात्र शिवसेनेने विविध प्रश्नांसाठी बांधकाम अधिका-यांची भेट घेतली. त्यावेळी बांधकाम विभागाच्या गेटवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी रोखले , तेव्हा पोलीस निरिक्षक मारुती जगताप व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत , राजु राठोड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्हाला कोणत्या कारणासाठी अडवता ? याची विचारणा पोलीस अधिका-यांनी केली. मात्र काहीवेळानंतर 8 ते 10 जणांचे शिष्ट मंडळाला बांधकाम कार्यालयात चर्चेसाठी सोडण्यात आले. या आंदोलनात विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निलम पालव सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सावंत,अनुप वारंग, महेश कोदे, बंडू ठाकूर, माधवी दळवी, कासार्डे विभाग प्रमुख तात्या निकम,आबु मेस्त्री,संजना कोलते,धनश्री मेस्त्री , नासीर शेख आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली , त्यांनी का वेळ दिली नाही.आम्हाला जी काय माहिती हवी आहे, ती तुम्ही देणार का ? सर्वगोड यांच्या वतीने तुम्ही बसला तर आम्हाला माहिती तुम्हीच दिली पाहिजे अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला यावरुन या विभागाने किती मोठा भ्रष्टाचार केला हे दिसून येत आहे. असा आऱोप कन्हैया पारकर यांनी केली. यावेळी तुम्हाला कोणकोणती माहिती पाहिजे ती सांगा आम्ही तुम्हाला ती काही दिवसांत देण्याची व्यवस्था करतो असे सांगितले.
त्यानंतर राजकोट किल्ला सुशोभिकरण , छत्रपतींचा पुतळा उभारणी , हॅलीपॅड उभारणी , रस्त्याची कामे ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानिमित्त ग्रासकटरने साफसफाई खर्च , हॉटेल खर्च , जेवणांची बिले , पुतळा कोसळल्यानंतर समितीने दिलेला अहवाल , नवीन पुतळा उभारण्यासाठी 20 कोटी खर्चाचे अंदाजपत्रक , स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट ही माहिती किती दिवसांत माहिती देणार ते सांगा, असे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगत बांधकाम उपअभियंत्यांना धरले धारेवर धरले. यावेळी 11 ऑक्टोबर पर्यंत ही माहीती लेखी स्वरुपात देण्याचे आश्वासन श्री. बातुसकर यांनी दिले.
त्यानंतर ओरोस येथील अधिक्षक अभियंता कार्यालयाचे इंटेरियर आणि फर्निचर कामाची निविदा झाली आहे का ? त्याची माहिती द्या. अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. त्यावर अभियंत्यांकडे कोणतीही माहिती नव्हती तसेच कणकवली तालुक्यातील 6.5 कोटी रुपयांच्या 2 निविदा वृत्तपत्रात आल्या आहेत. मात्र,१८ ची नोटीस ऑनलाईन का दिसत नाही ? हा प्रकार कामे मॅनेज करायचा आहे. यांचे ठेकेदार ठरलेले आहेत. याबाबत वृत्तपत्रात पुन्हा जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन झाले नसल्याची माहीती जाहीर करावी अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली. त्यावर अधिका-यांनी पुन्हा वृत्त पत्रात जाहिरात देण्याचे आश्वासन दिले.
हळवल पुलाच्या जोडरस्त्याचे काम का रखडले ? चार वर्षापूर्वी जिल्हाधिका-यांनी पैसे देवूनही बांधकाम विभागाचा दुर्लक्ष का ? असा सवाल सुशांत नाईक , कन्हैया पारकर यांनी केला. तसेच कणकवली तालुक्यातील विविध प्रश्नांचा भडीमार बांधकाम अधिका-यावर शिवसेना पदाधिका-यांनी केला. यावर अधिकारी निरुत्तर झाले होते.
बांधकाम कार्यालयासमोर शिवसैनिकांना अडवल्याने पोलीसांसोबत शाब्दिक बाचाबाची
कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचताच पोलीसांनी अडवले . यावेळी पोलीस व शिवसेना पदाधिका-यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तुम्ही आम्हाला कशाला अडवता ? आम्ही लोकशाही पध्दतीने अधिका-यांशी चर्चा करण्यासाठी आलो असे कन्हैया पारकर यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदच्या दारात खाजगी बाऊन्सर तर कणकवली बांधकामच्या दारात सरकारी पोलीस आम्हाला अडवून बाऊन्सरची भूमिका बजावत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिका-यांनी केला.
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी बांधकाम कार्यालयात विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही येणार असल्याचे जाहिर केले होते. मात्र कार्यकारी अभियंता कामानिमित्त मुंबईत गेल्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता होती. त्यामुळे कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!