कणकवली नगरपंचायतच्या भोंगळ कारभाराचा जनतेला बसतोय फटका
शहराच्या स्वच्छतेबाबत स्वच्छता निरीक्षकांकडूनच बेजबाबदार व दिशाभूल करणारी उत्तरे
माजी नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा आरोप
नगरपंचायत चा कारभार सध्या प्रशासन चालवीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून दरवर्षी स्वच्छता करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रास कटर मशीन चे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झाले नाही. व याला जबाबदार पूर्णपणे स्वच्छता निरीक्षक आहेत. असा आरोप माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केला आहे.
स्वच्छता निरीक्षक आपल्या स्व मार्जितल्या लोकांना खाजगीरित्या सफाई कामगार पाठवतात. तसेच कणकवली तहसीलदार ऑफिसच्या आवारा मध्ये तहसील कार्यालयाला स्व निधी खर्च करण्याची तरतूद असूनही शहरातील जनतेची मूलभूत नागरी कामे बाजूला ठेवून स्वच्छता मोहीम राबविली गेली. जनतेच्या सोयीपेक्षा तहसीलदार कार्यालय स्वच्छता निरीक्षकांना महत्त्वाचे आहे का?
कणकवली शहरात या प्रशासनाच्या कालावधीत जनतेला अतिशय वाईट अनुभव येत असून याला पूर्णपणे जबाबदार कणकवली न. पं. चे स्वच्छता निरीक्षक आहेत.
आज शहरात इतर सुशोभीकरण होत असताना हायवे वरील व आतील रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. वारंवार तक्रार करूनही स्वच्छता निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे कणकवली शहरात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. याप्रकरणी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी तातडीने लक्ष द्यावा अशी मागणी परुळेकर यांनी केली आहे. तसेच स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयीन कामाची चौकशी करावी अशी मागणी शहरवासियांन कडून होत आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली