अद्वैत मीडिया आयोजित कथा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

राज्यस्तरीय कथा स्पर्धेत किरण पाटील, चारुदत्त गोरे, राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत कविता झुंजारराव प्रथम

जिल्हास्तरीय कथास्पर्धेत डॉ हर्षदा देवधर, जिल्हास्तरीय काव्यस्पर्धेत श्रेयस शिंदे प्रथम

अद्वैत मीडिया आयोजित राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा मर्यादित कथा काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून राज्यस्तरीय कथा स्पर्धेत किरण पाटील , जयसिंगपूर आणि चारुदत्त गोरे ,पुणे यांच्या कथेला विभागून प्रथम क्रमांक मिळाला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कथा स्पर्धेत डॉ हर्षदा देवधर ,झाराप यांच्या कथेला प्रथम क्रमांक तर स्नेहा नारिंग्रेकर,शिरोडा यांच्या कथेला द्वितीय आणि प्रियांका सावंत ,खेड यांच्या कथेला तृतीय क्रमांक मिळाला आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेयस शिंदे, कळसुली, द्वितीय क्रमांक सिद्धी परब ,कणकवली आणि तृतीय क्रमांक विजय सुतार, राजापूर यांच्या कवितेला मिळाला आहे. कथा काव्य स्पर्धेला साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कथा स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध साहित्यि आनंदहरी यांनी तर काव्यस्पर्धेचे परीक्षण ख्यातनाम कवी वीरधवल परब यांनी केले.विजेत्यांच्या कथा कविता अद्वैत दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या जाणार असून रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन कणकवली येथील जाहीर कार्यक्रमात कथा काव्य स्पर्धा विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे मुख्य संपादक राजन चव्हाण, कार्यकारी संपादक सरिता पवार यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!