राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांचे यश.

कणकवली/मयूर ठाकूर
रंगोत्सव या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर रंगोत्सव स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे
या स्पर्धेअंतर्गत UKG पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कलरिंग, हॅन्ड रायटिंग, कोलाज मेकिंग ,कार्टून मेकिंग, ग्रीटिंग कार्ड मेकिंग, टॅटू मेकिंग, स्केचिंग या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत प्रशालेतील 73 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे, रिद्धी श्रेयश तायशेटे( 4th A ) हिने कलरींग मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला, तर श्रावणी सतीश सावंत ( 10 th B ) हिने कलरिंग मध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला ,कू.शिशु जिना (7 th B ) हिने कोलाज मेकिंग मध्ये आर्ट मेरिट अवॉर्ड मिळवला तर महिबा खान (3 rd ) हिने ग्रीटिंग कार्ड मेकिंग मध्ये आर्ट मेकिंग अवॉर्ड मिळवला. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनी ही गोल्ड,सिल्व्हर,ब्राँझ मेडल मिळवली
या शिवाय प्रशालेला आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम यांनाही अवॉर्ड प्राप्त झाला.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षणं संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्रा.हरीभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई , प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.