देवगड तालुक्यातील बापर्डे मधील ठाकरे गटाला धक्का

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या सक्रिय कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

बापर्डे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष व ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते संतोष मनोहर नाईक धुरे यांच्या नेतृत्वाखाली उमेश कृष्णा नाईक धुरे, हृदयनाथ नाईक धुरे, घनश्याम दुसंनकर, भगवान दत्ताराम नाईक धुरे, दिलीप बाळकृष्ण नाईक धुरे, किरण झोरे, प्रसाद अशोक नाईक धुरे, अभिषेक प्रसाद नाईक धुरे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बाळा खडपे, बंड्या नारकर, रवी पाळेकर, पंकज दुखंडे, बापर्डे सरपंच संजय लाड, माजी सरपंच श्रीकांत नाईक धुरे, अजित राणे, संदीप नाईक धुरे, विश्वास नाईक धुरे ,जीवन नाईक धुरे, हरेश नाईक धुरे आदि उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!