कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समिती वर भाजपाचे वर्चस्व!

सर्वच्या सर्व जागा भाजपाच्या ताब्यात
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवड प्रक्रियेत फॉर्म मागे घेण्याचा काल अंतिम दिवस होता. या समितीच्या आठ पैकी सात जागांवर भाजपाचे पॅनल बिनविरोध विजयी झाले आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहर भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक विराज भोसले, कंझुमर सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, गौरव हर्णे, सागर होंडावडेकर आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सागर होंडावडेकर, हरेश ढवन, संजय परब, हनुमंत तेंडुलकर, सानवी गावडे, शबिना मकतुमसाबा दोडमणी, सूर्यकांत ठाकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
दिगंबर वालावलकर /कणकवली
 
	




