प्राथमिक शाळा उंडील येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता फेरी

आचरा–अर्जुन बापर्डेकर
उंडील ता.देवगड प्राथमिक शाळा नं1 येथे महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा, कचरा मुक्त भारत संदेश देत विद्यार्थ्यांनी जि.प.शाळा उंडील नं.1 ते वैश्यवाणी समाज मठ उंडील पर्यंत स्वच्छता फेरी काढून जागृती केली.यावेळी उंडील सरपंच उज्वला यादव,उपसरपंच जयेश नर,पोलीस पाटील जयंती नर,मुख्याध्यापक ज्योती शेरुलकर
शिक्षक संतोष कदम,ग्रामपंचायत सदस्य सौ तावडे, शर्मिला परब,
,अंगणवाडी सेविका पार्वती नर,विधी तावडे, ग्रामपंचायत कर्मचारी स्वप्नील राणे यांसह पालक आदी सहभागी झाले होते.

error: Content is protected !!