कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामाला नगरपंचायत कडून नोटीस

टेंबवाडी येथील आत्माराम राणे यांनी केली होती नगरपंचायत कडे तक्रार

प्रदीप मांजरेकर, रामदास मांजरेकर यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

कणकवली नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 208 अ 7 सि स नंबर 1738 मध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कणकवली नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी कणकवली शहरातील माजी नगरसेवक प्रदीप मांजरेकर व रामदास मांजरेकर यांना नगरपंचायत कलम 52, 53 अंतर्गत नोटीस काढली आहे. त्यानुसार कलम 53 अंतर्गत अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे व कलम 52 अंतर्गत केलेले अनधिकृत बांधकाम तीस दिवसाच्या आत काढून टाकण्यात यावे अन्यथा वरील कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा या नोटीस द्वारे देण्यात आला आहे. याबाबत कणकवली शहरातील टेंबवाडी येथील आत्माराम राणे यांनी नगरपंचायत कडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रार अर्जात आत्माराम राणे यांनी म्हटले आहे, ती सदर मिळकत ही माझ्या नावे नमूद असून या मिळकतीमध्ये प्रदीप मांजरेकर व रामदास मांजरेकर यांनी अनधिकृतपणे शेडचे बांधकाम केले आहे. कणकवली नगरपंचायत कडून या बांधकामा विरोधात नोटीस देखील दिली गेली आहे. तरी देखील सदर अनधिकृत बांधकाम थांबवलेले नाही. त्यानंतर पाठवलेल्या दुसऱ्या नोटीस सोबत मांजरेकर यांनी चुकीचे व खोटे कागदपत्र जोडल्याचा दावा राणे यांनी केला आहे. त्यामुळे सदर बांधकाम हटवण्याबाबत श्री राणे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार कणकवली नगरपंचायत कडून संबंधितांना नोटीस काढण्यात आली आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!