ग्रामपंचायत मध्ये आता ग्रामपंचायत अधिकारी पद

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदे झाली इतिहास जमा

कालावधीनुसार प्रमोशन देखील मिळणार

राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांचे आता एकत्रीकरण करण्यात येणार आहे. एकत्रीकरण झाल्यानंतर येत्या काळात ग्रामपंचायत मधील या पदाला ग्रामपंचायत अधिकारी या नावाने आता ओळखले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. एकूण दोन असलेली ही पदे एकत्र करून त्याला 25 हजार 500 व 81 हजार 100 या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवत या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात आले आहे. नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदावर दहा वर्षानंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी वीस वर्षा नंतरच्या सेवेचा दुसरा लाभ सहाय्यक गटविकास अधिकारी व 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गटविकास अधिकारी असा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल ग्रामसेवक वर्गांमधून समाधान व्यक्त केले जात आहे

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!