सांगवे-गांवकरवाडीत बैठक असल्याचे सांगून भाजपमध्ये प्रवेश दाखवला!

काल प्रवेश केलेल्यातील काहींचे आज ठाकरे शिवसेनेसोबत एकत्र येत स्पष्टीकरण

आमदार नितेश राणेंकडून खोटे प्रवेश घेत वातावरण करण्याचा प्रयत्न

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा राणेंवर घणाघात

सांगवे – गावकरवाडी मधील काही ग्रामस्थांनी आज शिवसेना ठाकरे गटासोबत येत काल घेतलेला भाजपा प्रवेश हा फसवून घेण्यात आला होता हे सांगितले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले,शिवसेनचा गड अभेद्य आहे. बाळासाहेबांचे विचार कोकणवासियांच्या मना-मनामध्ये रुजलेले आहेत. त्यामुळे आमदार नितेश रानेंनी खोटे प्रवेश दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसैनिक शिवसेनेपासून दूर जाणार नाहीत. गावकारवाडीतील जी काही कामे असतील ती शिवसेनेचा माध्यमातून पूर्ण केली जातील.
सुशांत नाईक म्हणाले, आमदार नितेश असेच कणकवली मतदार संघा मध्ये खोटे प्रवेश काही ठिकाणी दाखवत आहेत. प्रवेश दाखवून सुद्धा कोकणी जनता तुमच्या बरोबर नाही. कणकवलीच्या जनतेचा शिवसेने वरती पूर्ण विश्वास आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्या नंतर विकासकामांची पूर्तता असेल ती कामे पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यापुढे खोटे प्रवेश दाखवल्यास शिवसेनेच्या याच पद्धतीने पोलखोल केली जाईल. यावेळी काल भाजपा प्रवेशा वेळी उपस्थित असलेल्या समीर गांवकर व ग्रामस्थांनी सांगितले की आम्हाला वाडीची बैठक आहे म्हणून बोलवन्यात आले. व आमची दिशाभूल करून आमचा खोटा प्रवेश दाखवण्यात आला. आम्ही सदैव शिवसेने सोबत आहोत आणि कायम राहणार. यावेळी हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, संदीप गांवकर, तुषार गांवकर, कुणाल सावंत, संकेत गांवकर, संकेत म्हापणकर, सुमित गांवकर, दीपक घाडीगांवकर, प्रसाद गांवकर, शैलेश गांवकर, आदी उपस्थित होते.काल प्रवेश केल्याचे सांगितले पण त्यांनी प्रवेश केला नव्हता व आज ते उपस्थित होते. असे
समीर गांवकर, रवींद्र गांवकर, सुमित गावकर, विलास गांवकर, राजेंद्र गांवकर, मंगाजी गांवकर, मधुकर गांवकर, अजय घाडीगावकर, सुशील गांवकर, हृषीकेश वाळके, अनिकेत गांवकर हे प्रवेशकर्ते नव्हतेच असे नाईक यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!