कुर्ली येथील वासंती पाटील यांचे निधन

कुर्ली गावठाणवाडी येथील रहिवासी वासंती वामन पाटील वय 87 वर्षे यांचे 8 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी कोकिसरे ता. वैभववाडी येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुर्ली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुक्यातील व कुर्ली गावातील मित्र मंडळी, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी येथील डॉ. उदय पाटील यांच्या त्या मातोश्री तर वैभववाडी नायब तहसिलदार दिलीप पाटील व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन पाटील यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.





