जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सज्ज !

पहाटे 3 वाजता सुरू होणार देवीचे दर्शन

9 दर्शन रांगा आणि 7 स्वयंसेवक रागा

अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन

रात्री 9 ते 12 पर्यंत दर्शन रांग धार्मिक विधीसाठी बंद

            नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. भाविक हा केंद्रबिंदू मानून देवीच्या सुलभ आणि तत्पर दर्शनासाठी अतिशय योग्य आणि सुसज्ज नियोजन करून आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि प्रशासन सज्ज झाले आहे. जत्रोत्सवादिवशी 9 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजता भाविकांसाठी देवीचे दर्शन सुरू होणार असून रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर रात्री 9 ते 12 धार्मिक विधींसाठी भाविकांना देवीचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. 10 फेब्रुवारी मोड जत्रे दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना देवीचे दर्शन होणार आहे अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी आंगणेवाडी येथे दिली.
error: Content is protected !!