कुडाळात मतमोजणीची तयारी पूर्ण

१८ टेबल्स, ११ फेऱ्या
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. या ‘मिनी विधानसभा’ निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कुडाळ तहसील कार्यालय सज्ज झाले असून, सकाळी १० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत ऐश्वर्या काळुसे यांनी मतमोजणीच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. असे
सकाळी १० वाजता प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर १०.३० वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान यंत्रांमधील (EVM) मतांची मोजणी सुरू केली जाईल. मतमोजणीसाठी एकूण १८ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय ही संपूर्ण प्रक्रिया एकूण ११ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर १ झोनल अधिकारी आणि १ ग्राम महसूल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते प्रत्यक्षात गणांची मतमोजणी करणार आहेत.
मतमोजणीचा श्रीगणेशा आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातून होणार आहे.
कुडाळ तालुक्यात मतदानाची अंतिम आकडेवारी
संपूर्ण तालुक्यात सरासरी ५९.७४% मतदान झाले असून एकूण ६९,६७९ मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद केले आहे.
जिल्हा परिषद मतदार संघ (गट) झालेली मते टक्केवारी
पावशी ८,१०२ ६४.८७%
माणगाव ८,६९६ ६३.९८%
घावनाळे ८,६५० ६३.०४%
तेंडोली ७,७८० ६०.७७%
नेरूर ७,५९६ ६०.२८%
पिंगुळी ८,३१२ ५९.९०%
वेताळ बांबर्डे ७,२५३ ५६.०७%
आंब्रड ६,९७८ ५५.४२%
ओरोस बुद्रुक ६,३१२ ५२.५३%
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी तहसील कार्यालयामध्ये केवळ
उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी (मीडिया), ओळखपत्र असलेले सरकारी कर्मचारी
यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पावशी आणि माणगाव पट्ट्यात झालेल्या वाढीव मतदानामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानाची ही टक्केवारी कोणाला विजयाची ‘लॉटरी’ लावणार आणि कोणाचा ‘पत्ता कट’ करणार, याची चर्चा आता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात रंगली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस बुद्रुकसह सर्वच गटांच्या निकालांकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पावशी आणि माणगाव पट्ट्यात झालेल्या वाढीव मतदानामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानाची ही टक्केवारी कोणाला विजयाची ‘लॉटरी’ लावणार आणि कोणाचा ‘पत्ता कट’ करणार, याची चर्चा आता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात रंगली आहे.





