कुडाळ पं. स. मध्ये महायुतीला १३ जागा

ठाकरे सेनेच्या ५ जागांवर विजयी
कुडाळ पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १३ ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपला ७ तर शिवसेनेने ६ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ५ ठिकाणी बाजी मारली आहे.
आंब्रड मध्ये नितीन महाडेश्वर (भाजप), पिंगुळी ममता राऊळ (ठाकरे सेना), साळगाव मध्ये मिलिंद नाईक (शिवसेना), कसाल संतोष कांदळकर (ठाकरे सेना), डिगसमध्ये निखिल कांदळगावकर (शिवसेना), माणगाव योगेश धुरी (ठाकरे सेना), झाराप मधून सिताराम तेली (भाजप), जांभवडेतुन बाळकृष्ण मढव (शिवसेना), आवळेगावमध्ये श्रावणी तेरसे (भाजप), वेताळ बांबर्डे मध्ये अश्विनी सावंत (शिवसेना), ओरोस मधून अमित भोगले (भाजप), पावशी करुणा पावसकर (भाजप), नेरुर उत्तर मधून दीप्ती नाईक (ठाकरे सेना), नेरुर दक्षिण मधून अर्चना बंगे (ठाकरे सेना), तेंडोली मंगेश प्रभू (भाजप), घावनळेतुन अर्चना घावनळकर (भाजप), पाट मध्ये प्रियांका दळवी (शिवसेना), गोठोस मधून दिव्यांगी खरात (शिवसेना) हे उमेदवार पंचायत समिती साठी निवडून आले आहेत.
दरम्यान पंचायत समितीच्या १८ गणांपैकी भाजप ७, शिवसेना ६ तर उबाठा ५ जागांवर विजयी झाले आहेत.





