जि. पं. निवडणुकीत कुडाळमध्ये शिवसेना ५ तर भाजप २ जागांवर विजयी

अशी आहेत उमेदवारांना मिळालेली मते आणि मताधिक्य
तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. तर ठाकरे सेनेचा एक व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. काही निकाला मध्ये तर शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच असल्यामुळे उमेदवारांची धाकधूक बघायला मिळाली.
घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ दीपक नारकर (शिवसेना), माणगाव मध्ये रुपेश कानडे (शिवसेना), पावशीमध्ये तुकाराम उर्फ दादा साईल (शिवसेना), तेंडोलीमध्ये आरती पाटील (भाजप), पिंगुळीत गंगाराम सडवलकर (ठाकरेसेना), नेरुर मध्ये रुपेश पावसकर (अपक्ष), आंब्रड दीपलक्ष्मी पडते (शिवसेना), ओरोस मध्ये सुप्रिया वालावलकर (भाजप), वेताळबांबर्डे नागेश आईर (शिवसेना) विजयी झाले आहेत.
दरम्यान कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटातून शिवसेना पाच, भाजप २, उबाठा एक तर अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत.
आंब्रड: झालेले मतदान-6990 , मताधिक्य- 2159;
दिपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना) विजयी 4505
शेजल परब (उबाठा) 2346
वेताळ बांबर्डे: झालेले मतदान- 7689, मताधिक्य- 1325
नागेश आईर (शिंदे शिवसेना) विजयी 4424
बाजीराव झेंडे (उबाठा) 3099
ओरोस बुद्रुक: झालेले मतदान- 6368, मताधिक्य- 2597
सुप्रिया वालावलकर (भाजपा) विजयी 4394
जान्हवी सावंत (उबाठा)1797
पावशी: झालेले मतदान- 8123 , मताधिक्य- 22
तुकाराम साईल (शिंदे शिवसेना), विजयी 3936
अमरसेन सावंत (उबाठा) 3914,
भिकाजी जाधव (वंचित बहुजन आघाडी) 117,
भानुदास रावराणे (अपक्ष) 47
नेरूर देऊळवाडा : झालेले मतदान- 7603 , मताधिक्य- 1538
रुपेश पावसकर (अपक्ष) विजयी 4475
संजय पडते (शिंदेसेना), 2937
तेंडोली: झालेले मतदान- 7802, मताधिक्य- 1438
आरती पाटील (भाजपा) विजयी 4508
सुजाता गावडे (उबाठा) 3070
पिंगुळी : झालेले मतदान- 8374, मताधिक्य- 656
गंगाराम सडवेलकर (उबाठा), विजयी 4294
अजय आकेरकर (भाजपा) 3638
गजानन राऊळ (मनसे) 237
घावनळे: झालेले मतदान- 8680 , मताधिक्य- 984
दीपक नारकर (शिंदे शिवसेना) विजयी 4726
सखाराम खोचरे (उबाठा) 3742
माणगाव: झालेले मतदान- 8723, मताधिक्य- 410
रुपेश कानडे (शिंदे शिवसेना) विजयी 4403
रमाकांत ताम्हणेकर (उबाठा) 3993
प्रसाद नार्वेकर (अपक्ष) 180





