श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिर अध्यक्ष महेशदादा इंगळे यांची राकेश कांदे यांच्या निवासस्थानी भेट

कांदे परिवाराकडून पाद्यपूजा
श्री. इंगळे यांच्याकडून स्वामींचे अनुभव कथन
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ (वटवृक्ष) मंदिराचे अध्यक्ष महेशदादा इंगळे साहेब यांनी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कांदे कुटुंबीयांकडून त्यांची पाद्यपूजा करण्यात आला. तसेच स्वामीभक्तांच्या उपस्थितीत आणि स्वामी नामघोषात त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. इंगळे यांनी स्वामी समर्थांचे अनुभव कथन करत स्वामी भक्तांना मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले.
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष महेशदादा इंगळे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या कुडाळ – नाबरवाडी येथील “स्वामी सदन” या निवासस्थानी आवर्जून भेट दिली. सर्वप्रथम कांदे परिवाराने त्यांचे औक्षण करून त्यांची पाद्यपूजा केली. स्वामी समर्थांची प्रतिमा, शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अक्कलकोट येथील मंदिराचे चेअरमन महेशदादा मालक इंगळे साहेब, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, चिरंजीव प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, देवगड हडपीठ मठाचे नंदकुमार पेडणेकर यांच्या सह १०० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. यावेळी इंगळे साहेब यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव कथन आणि मार्गदर्शन केले. आणि आशीर्वाद दिले. स्वामींच्या नामस्मरणात आणि जयघोषांत हा सोहळा पार पडला.
यावेळी स्वामी भक्त सदानंद कांदे, सागर कांदे, अनिश सावंत, राजेश मांजरेकर, नितीन सोलकर, सचिन कुडतरकर, बापू सावंत, मयूर कुडतरकर, जितू राणे, विलास रुद्रे, स्वरूप सावंत, सागर मठकर, प्रथमेश वर्दम, पप्पू शिरसाठ, कौस्तुभ कुडतरकर, बनी तळवलकर, शशांक पिंगुळकर, अविनाश पाटील, अभय म्हापसेकर, सौ.वनिता जाधव, श्री. कुणकावळेकर यांच्यासह असंख्य स्वामीभक्त सहभागी झाले होते.





