कुडाळात मतमोजणीनिमित्त वेंगुर्ले-सावंतवाडी रस्ता वाहतूक बंद राहणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी तहसिलदार कार्यालय कुडाळच्या आवाराजवळून जाणाऱ्या वेंगुर्ला-सावंतवाडी रस्त्याची वाहतूक मतमोजणी कालावधीपुरती पूर्णतः बंद करुन, सदरची वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्याअन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत ०९ जि.प. निवडणूक विभाग व १८ पंचायत समिती निर्वाचक गणांची एकुण १५३ मतदान केंद्राची मतमोजणी तहसिलदार कार्यालय कुडाळ, मध्यवर्ती सभागृह येथे दि.०९/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून, होणार आहे.
या मतमोजणीवेळी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने, कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी तसेच, उपस्थित जमावामधिल संघर्ष टाळण्यासाठी तहसिलदार कार्यालय कुडाळच्या आवाराजवळून जाणाऱ्या वेंगुर्ला-सावंतवाडी रस्त्याची वाहतूक सकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंतच्या कालावधीपुरती पूर्णतः बंद करुन, सदरची वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविणेबाबत पोलीस निरीक्षक कुडाळ यांच्या वाहतुक नियंत्रण विभागास सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

error: Content is protected !!