शिरवंडे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना नालंदा पुरस्कार

पुणे येथे होणार पुरस्काराचे वितरण
कणकवलीचे सुपुत्र तथा शिरवडे गावाचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार वितरण सोहळा शनिवार १४ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात शिक्षण, कला ,आरोग्य, सामाजिक, राजकीय, उद्योग ,कृषी क्रीडा ,अध्यात्म ,पत्रकार , युवा महिला ,आदर्श ग्रामपंचायत या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सचिन पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल फेटा आहे. पुरस्कार वितरण सोहळा पुणे पत्रकार भवन या ठिकाणी पार पाडणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पवार यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. सचिन पवार यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यशैलीचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे.





