कणकवलीत “आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी” विषयावर मार्गदर्शन

लायन्स क्लब कणकवली यांच्यावतीने आयोजन
आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी जीवनासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे मार्गदर्शन देणारा “आरोग्यदायी जीवनशैली सर्वांसाठी” हा विशेष कार्यक्रम येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी कणकवली महाविद्यालय येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात डॉ. अविनाश सावजी (जीवनशैली व आरोग्य तज्ज्ञ, अमरावती) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. सावजी यांना जीवनशैली आधारित उपचार क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी 1 हजार हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. जीवनशैलीत योग्य बदल करून मधुमेह, रक्तदाब, स्थूलता यांसारख्या अनेक दीर्घकालीन आजारांवर नियंत्रण कसे मिळवता येते, यावर ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६ या वेळेत HPCL हॉल, कणकवली महाविद्यालय येथे होणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन लायन्स क्लब, कणकवली यांच्या वतीने करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब कणकवली चे अध्यक्ष डॉ. प्रविण बिरमोळे, सेक्रेटरी दिवाकर मुरकर यांनी केले आहे.





