आशिये येथील विलास आणि लता खानोलकर यांचा कुडाळदेशकर समाजाच्या वतीने हृद्य सत्कार

अतिरुद्र स्वहाकार महायज्ञाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल समाजातर्फे कौतुकाची थाप

सर्वच भक्तगण, आशिये ग्रामस्थ, दात्यांच्या माध्यमातून हा महायज्ञ यशस्वी झाला, विलास खानोलकर

आशिये दत्तमंदिरचे उपासक आणि नुकत्याच पार पडलेल्या अतिरुद्र स्वाहाकार या महायज्ञाचे यजमान दांपत्य श्री. विलास आणि सौ. लता खानोलकर यांचा हृद्य सत्कार कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज बांधवामार्फत आशिये येथील दत्तमंदिर सभागृहात करण्यात आला.
हा महायज्ञ आयोजकांनी विश्वकल्याणाकरिता केल्याचे खानोलकर उभयतांनी आवर्जून सांगितले. आपण केवळ निमित्तमात्र असून दत्तगुरु आणि रुद्रदेवता यांनी प्रेरणा देऊन आपल्यामार्फत परंतु संपूर्ण आशिये ग्रामस्थ, ज्ञातीबांधव, मित्र परिवार, दत्तभक्त आणि रुद्र उपासक यांच्या सहकार्याने करून घेतला आहे असे विलास खानोलकर म्हणाले.
कार्यक्रमाचे समायोचीत प्रास्ताविक श्री. बाबुराव सामंत यांनी केले तर शाल श्रीफळ देऊन सत्कार श्री. प्रभू गुरुजी, सुनील गुरुनाथ आजगावकर, राजेश आजगावकर, ॲड. एन आर देसाई, प्रसन्ना देसाई, प्रमोद सामंत, सुयोग टिकले, मंदार अवसरे, पप्पू खानोलकर, विशाल सामंत, हेमंत परुळेकर, सुनेत्रा आजगावकर, मृणाल ठाकूर, सपना देसाई, चारूवहिनी, स्नेहा खानोलकर, नम्रता सामंत, विनया खानोलकर, नीता तेंडुलकर, सुरेखा परुळेकर, लीना केळुसकर, कांचन खानोलकर, रूपा प्रभू, प्रीती आजगावकर आदीनी एकत्रितपणे केला.
या घरगुती सत्काराने आपणास अजून मोठे धार्मिक कार्य करण्यास उद्युक्त होता येईल असे खानोलकर म्हणाले. आपल्या सोबत आपली सहधर्मचारिणी सौ. लता ठामपणे उभी राहिल्यानेच आपण हे शिवधनुष्य पेलवू शकलो असे नमूद करायला विलास खानोलकर विसरले नाहीत.

error: Content is protected !!