आचरा बंदर रस्त्यावरील अपघातास कारणीभूत तो पोल हटवला

आचरा बंदर रस्त्यावर भंडारवाडी प्राथमिक शाळे लगत अपघातास कारणीभूत ठरणारा अर्धवट मोडून राहीलेला पोल सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या पुढाकाराने मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला.त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आचरा बंदर रस्त्यावर अर्धवट स्थितीत राहिलेला लोखंडी पोलला चारचाकी वाहने धडकून गाड्या पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले होते.याबाबत शिवरामेश्वर भजन मंडळाचे रवी बागवे यांनी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांचे लक्ष वेधले होते.त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करत जेसीबीच्या सहाय्याने तो धोकादायक पोल हटवला.वाहतूकीला धोकादायक पोल सरपंच फर्नांडिस यांच्या पुढाकाराने हटविण्यात आल्याने वाहतूकदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!