वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित त्रिसूत्री संगीत महोत्सवाचा शुभारंभ

२०२५ मधील वामन दाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
संगीत साधना तपात मोजली जाते – पंडीत समीर दुबळे
वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धेचे उद्घाटन पंडित रामशंकर (बनारस) यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या सघनगान केंद्राचे गुरू पंडित समीर दुबळे, तबला वादन प्रशिक्षण केंद्राचे गुरू चारूदत्त फडके, संस्थेचे आश्रयदाते कल्पक डेव्हलपर सर्वेसर्वा मा. सुनिल पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त मा. डाॅ. समीर नवरे, विश्वस्त सी.ए. दामोदर खानोलकर कार्यवाह शरद सावंत, सहकार्यवाह सीमा कोरगावकर, खजीनदार धनराज दळवी, कार्यकारिणी सदस्य,राजा राजाध्यक्ष, अमीता कुलकर्णी, हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारिणी सदस्य डाॅ. निलेश कोदे यांनी केले.
यावेळी या महोत्सवास शुभेच्छा देताना डॉ. पंडीत समीर दुबळे यांनी शात्रिय संगितची चळवळ अखंडपणे चालविणे कठीण आहे. त्यात ही कणकवली सारख्या छोट्या शहरात ते अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. संस्था ते पेलत आहे म्हणून संस्थेचे नाव सर्वश्रुत आहे. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना सर म्हणाले संगीत साधना तपात (१२वर्षे)मोजली जाते. एक तप दोन तप तीन तप त्यानंतर शास्त्रीय संगीत थोडेफार संमजायला लागते. शास्त्रीय संगीत शिक्षणाचे काठिण्य विषद केले. संध्याकाळी स्पर्धा विजेता चे गायन व सघनगान ची विद्यार्थी कु. सानिका गावडे हिचे गायन होऊन आजच्या दिवसाची सांगता पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायन मैफील ने होणार आहे.





