शिवसेना ठाकरे गटाच्या कणकवली तालुका नवरात्र समिती अध्यक्ष पदी रामदास विखाळे
खजिनदार पदी विलास गुडेकर यांची निवड
कणकवली – शिवसेना ठाकरे गट तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव 2024 च्या नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष पदी रामदास विखाळे तर खजिनदार पदी मा. विलास गुडेकर यांची नेमणूक करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली त्यावेळी आम. वैभव नाईक यांनी सर्व संमतीने ही निवड केली.दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. स्ट्रिक सिन दशावतार नाटके,डबलबारी भजन सामने,फुगडी,पैठणी गोंधळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत
या बैठकीला जेष्ठ शिवसैनिक राजू शेट्ये,युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक,उपतालुकाप्रमुख राजू राणे,तालुका समन्वयक राजू राठोड, रामदास विखाळे,तालुका महिला आघाडी प्रमुख वैदेही गुडेकर,माधवी दळवी,संजना कोलते, दिव्या साळगावकर, स्नेहा धुरी,सचिन आचरेकर, विलास गुडेकर,रोहित राणे, अजित काणेकर,कोकि पाटकर,व शिवसैनिक उपस्थित होते, सर्वानी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले.