बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा

वंदे मातरम या गीताला प्रकाशित होऊन १५० वर्षे पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर वंदे मातरम गीताचा १५०वा वर्धापन दिन 7 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक अरुण मर्गज यानी वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन का आपण साजरा करतो आहोत, त्याच्या निर्मिती मागची, प्रकाशन मागची पार्श्वभूमी उपस्थितांना कथन केली. बकीमचंद्र चटर्जी यांनी हे वंदे मातरम गीत १८७० मध्ये जरी लिहिले . तरी सुद्धा ते ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘वंगदर्शन’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले. या घटनेला आज १५० वर्ष पूर्ण झाली म्हणून या गीताचा १५० वा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. असे प्रा. मर्गज यांनी सांगितले.
राजू राऊळ म्हणाले, वंदेमातरम हे भारतमातेप्रती श्रद्धाभाव आणि देश प्रेम व्यक्त करण्याचा एक महामार्ग असणारे राष्ट्रगीत आहे. त्याचं सर्वांनी पारायण करणे गरजेचे आहे. या उपक्रमाला आपण उपस्थित राहून शाश्वत देशभक्तीबद्दल, देश प्रेमाबद्दल निष्ठा व्यक्त केल्याबद्दल, राष्ट्र प्रथम या संकल्पनेवरील श्रद्धा व्यक्त केल्याबद्दल सर्व उपस्थितांना श्री. राऊळ यांनी धन्यवाद दिले. त्या दृष्टीने केंद्र शासनाचा एक स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी नोंदवत केंद्र शासनाचे आभार मानले..
या सदर उपक्रमाला देश प्रेमी नागरिक, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचेचेअरमन उमेश गाळवणकर, रणजीत देसाई, संध्या तेरसे, बंड्या उर्फ अनिल सावंत, रुपेश कानडे, राजू राऊळ, अरुणा देसाई, संजय वेंगुर्लेकर, श्रेया गवंडे, राजू गवंडे, अजय सावंत, अजय आकेरकर, किरण शिंदे, साधना माड्ये, अदिती सावंत, मुक्ती परब, प्रज्ञा राणे, मृणाल देसाई, विशाखा कुलकर्णी, प्रा. नितीन बाम्बर्डेकर, बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बॅरिस्टर नाथ पै बी. एड कॉलेजची प्राचार्य परेश धावडे, नाथ पै ज्युनिअर कॉलेजचे प्र. प्राचार्य मंदार जोशी, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉक्टर प्रत्युष रंजन बिस्वाल, प्रा. वैशाली ओटवणेकर व त्यांचे सहकारी, विद्यार्थी, अन्य देशप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!